नारायण साई म्हणतो, माझे आठ महिलांबरोबर शारिरीक संबंध

अहमदाबाद – स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई याने आपल्यावरील बलात्काराच्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्याने आपले आठ महिलांबरोबर शरिरीक संबंध असल्याचाही खुलासा केला आहे.

मंगळवारी पोलिसांना चौकशी दरम्यान आपल्यावरील आरोपांबाबत खुलासा करताना नारायण साई म्हणाला, की माझे त्या मुलीबरोबर शारिरीक संबंध होते. पण, मी कधीही तिच्यावर बळजबरी केली नाही. आमच्यातील संबंध सहमतीने होते. आपली सेविका असलेल्या जमुनाचा मुलगाही माझाच मुलगा आहे. माझे आठ महिलांबरोबर शारिरीक संबंध होते.

नारायण साईच्या या खुलाश्यानंतर पीडित महिला म्हणाली, की नारायण साई आमच्यात सहमतीने संबंध असल्याचे खोटे सांगत आहे. तो दररोज नवनव्या मुलींना आश्रमात घेवून येत असे. काही वेळेस मुलींना परदेशातूनही मागविण्यात येत असे. नारायण साईच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असून, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नारायण साई याला सुरतमधील सख्ख्या बहिणींवर करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणी
अटक करण्यात आलेली आहे. तीन महिन्यांच्या शोधानंतर तो पोलिसांच्या हाती लागला आहे.