पणजी – तरूण तेजपाल यांच्या कोठडीचा रिमांड मंगळवारी संपल्याने पोलिसांनी बुधवारी त्यांना प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले. तेजपाल यांच्यावर सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी पोलीस कोठडीत १२ दिवसांनी वाढ केली आहे. एक डिसेंबर रोजी तेजपाल चौकशीसाठी सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.
त्यांच्या चौकशीचे बरेच काम अजून बाकी असल्याने त्यांची कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी पोलिसंनी केली होती. त्यानुसार तेजपाल यांची पोलीस कोठडी १२ दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. गोवा येथील थिंक फेस्ट महोत्सवात तहलकाचे तरुण तेजपाल यांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार याच साप्ताहिकात काम करणा-या एका महिला पत्रकाराने साप्ताहिकाच्या व्यवस्थापनाकडे केली होती.
यानंतर गोवा पोलिसांनी स्वेच्छा दखल घेत तेजपालविरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हाय दाखल केला होता. त्यांखनतर १ डिसेंबर रोजी सहा दिवसाची कोठडी सुनाण्यायत आली होती. ती मुदत संपल्यावर त्यांच्या कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ करण्यात आली होती. त्यासनंतर आज पून्हां बारा दिवसांने पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.