आयेशा टाकिया झाली आई

`टारझन द वन्डर कार` सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आयेशा टाकीया ब-याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. ‘वॉन्टेड’ सिनेमातली सलमान खानची अभिनेत्री आणि अबु आझमींची सून अभिनेत्री आयेशा टाकिया आई झाली आहे. आयेशा टाकियाला नुकताच मुलगा झाला आहे.

`सूरक्षेत्र` या टीव्हीवरील संगीत रियालिटी शोमध्ये शेवटची दिसलेल्या आयेशाने गेल्या आठवड्यात पुत्ररत्नाला जन्म दिला. तिच्या घरी आनंदाचं वातावरण असून, पती फरहान आझमीनं टि्वटरवर लिहिलेल्या संदेशात देवाचे आभार मानत आनंद व्यक्त केला.

आयेशानंदेखील टि्वटरवर प्रियजनांचे आभार मानून आपला आनंद व्यक्त केला.
टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात ती म्हणते, प्रियजनांकडून मिळालेले आशीर्वाद व शुभसंदेशांसाठी मी आणि माझा मुलगा सर्वांचे आभारी आहोत. सलमान खानबरोबर `वॉन्टेड` सिनेमात काम केलेल्या आयेशाने `डोर` आणि `फूल एन फायनल`सारख्या सिनेमातदेखील काम केले होतं.