रणबीर कपूरला हवाय चेंज

बॉलिवुड स्टार रणबीर कपूरने सध्याच त्याचे लक्ष्य ठरविले आहे. आगामी काळात तो त्याच्या इमेजमध्ये बदल करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून खूप मेहनत घेत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात येत असलेल्या ‘बॉम्बे वेलवेट’ या सिनेमासाठी तो खूपच घाम गाळत आहे.

रणबीरने यापूर्वी या रोल्समध्येे खूपच एक्सपेरिमेंट केले आहेत. त्याची इमेज एक रोमांटिक हीरो म्हणून आहे. ‘बॉम्बे वेलवेट’ मधून रणबीर कपूर वेगळी भूमीका करणार आहे. यासिनेमातून रणबीर रफ-टफ रोल करीत असून पर्फेक्ट लुकसाठी तो प्रायॉरिटी देत आहे. या सिनेमाचे पहिले शेड़यूल श्रीलंकामध्ये पूर्ण झाले आहे.

या सिनेमाच्या पुढच्या शेडयूलसाठी रणबीर आता मार्शल आर्ट और किक बॉक्सिंग या दोन्हींची ट्रेनिंग घेत आहे. त्यामुळे सध्या याचे वर्कआउट करण्यासाठी तो प्रोटीन डायट करीत आहे; रणबीर या सिनेमासाठी घेत असलेल्या मेहनतीमुळे डायरेक्टर अनुराग कश्यप खूपच खुश आहेत. हा एक पीरियड सिनेमा असून त्याचा बैकड्रॉप ६० दशकातील मुंबईशी आहे. या सिनेमात रणबीर कपूरसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा लीड रोल करीत आहे.