दिल्लीमध्ये सत्ता कोणाची, चर्चेला उत

नवी दिल्ली- आम आदमी पार्टीमुळे दिल्लीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. आम आदमी पार्टीने पहिल्याच निवडणुकीत २८ जागा पटकावल्या आहेत. तर दुसरीकडे १५ वर्षांपूर्वी दिल्लीत सत्ता गमावलेल्या भाजपने ३१ जागा मिळवल्या आहेत. मात्र एवढ्या जागा मिळवूनही भाजपला बहूमतासाठी आणखी ५ जागांची गरज आहे. त्यामुळे याठिकाणी सत्ता कोणची येणार याची चर्चा जोरात रंगली आहे. भाजप मोठा पक्ष असलातरी ३६ चा जादूई आकडा गाठणे त्यांना शक्यच नाही. त्यामुळे आगामी काळात कोण सत्तात स्थापन करणार याकडे लक्ष लागले आहे.

सत्तेत येण्यासाठी सहज पाठिंबा मिळाला तर सत्ता स्थापन करू असे दिल्ली भाजपचे प्रभारी नितीन गडकरींनी म्हटले आहे; तर आम आदमी पार्टीने आम्ही कुणाचीही साथ घेणार नाही. विरोधी पक्ष म्हणून बसू… मात्र भाजप आणि आम आदमी पार्टीच्या या ‘पहले आप पहले आप’च्या फे-यात सामान्य दिल्लीकर अडकले आहेत. आता दिल्लीत नेमकं काय होते पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन, सुरक्षा व्यवस्था अशा सगळ्या मुद्यांवर थेट दिल्लीमध्ये सत्तेच्या जवळ आम आदमी पार्टी गेली आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल या सगळ्यामध्ये हिरो ठरले आहेत. मात्र त्यांकनी अजूनतरी दिल्लीत सत्ता स्था‍पन करण्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे आगामी काळात कोण सत्ता स्था‍पन करणार याकडे दिल्लीेवासियांचे लक्ष लागले आहे.