पुणेः डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासासाठी गोव्यातून आणलेल्या दोन संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली मात्र त्यांनी ही हत्याच केली नसल्याचे उघड झाले आहे. दाभोलकर यांच्या मारेक-यांशी त्यांचे वर्णन जुळत असल्याने त्यांना तपासासाठी ताब्यात घेतल्याचा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात आला होता.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासासाठी गोव्यातून दोन संशयितांना अटक केल्याीचा आनंद काही तासांसाठीच राहिला. कारण, बेदम मार पडेल या भीतीने या अटक करण्यापत आलेल्याे दोन गुन्हेगारांनी गुन्हाण कबूल केला होता. या संशयितांकडे केलेल्या तपासानंतर मात्र डोंगर पोखरून उंदीर काढल्याची चर्चा पोलिस दलात रंगली होती.
दाभोलकर यांच्या मारेक-यांशी त्यांचे वर्णन जुळत असल्याने त्यांना तपासासाठी ताब्यात घेतल्याचा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात आला होता. माराच्या भीतीने त्यांनी दाभोलकर हत्येत सहभाग असल्याची कबुली दिली. मारेक-यानीच कबुली दिल्यावर पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांमध्ये सुटकेचा निश्वास टाकला.
गेल्याऱ दोन दिवसांपासून पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगात फिरत होती. रातोरात एक पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी विरारला रवाना झाले होते. संशयितांनी सांगितलेल्या सर्व माहितीची खातरजमा झाल्यावर त्यांचा खोटेपणा उघड झाला. हा सर्व प्रकार पहाटे तीनपर्यंत सुरू होता. सर्व प्रकारची चौकशी केल्यानंतर संशयित बोगस असल्याचे लक्षात आल्यावर सर्व अधिकारी घरी परतले.