राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला

पुणे- गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील सर्वच शहरातील तापमान वेगाने खाली आले आहे. राज्यातील अनेक शहरांतील तापमान सरासरीच्या चांगलेच खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यातील तापमान दहा अंशांच्या खाली आल्याने थंडीने चांगलीच हुडहुडी भरली आहे. येत्या २४ तासांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली असल्याने आगामी काळात पण हा थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे ८.४ तर पुणे येथे ९.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दोन वादळांच्या प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला होता. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली होती. आता पुन्हा उत्तरेकडून येणारे थंड वारे वाहू लागल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.अनेक शहरातील तापमानात चांगली घट झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमान वेगाने खाली आले आहे. शनिवारी तापमान १० अंशांच्या खाली आले. त्यामुळे सायंकाळी व सकाळी चांगली थंडी जाणवत आहे. येत्या २४ तासांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे ८.४ तर त्याखालोखाल पुणे येथे ९.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आगामी काळात पण हा थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.