ऑस्ट्रेलियातली ती नटराजाची मूर्ती चोरून आणलेली

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाच्या राजधानीतील नॅशनल गॅलरी ऑङ्ग ऑस्ट्रेलिया या कलात्मक वस्तूच्या जगप्रसिध्द संग्रहालयातील सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली नटराजाची मूर्ती ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही बातमी खरी असल्यास ही मूर्ती आपल्याला विकणार्‍या सुभाष कपूर या भारतीय व्यापार्‍यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे या वस्तू संग्रहालयाच्या संचालकांनी स्पष्ट केले आहे.

सदर नटराजाची मूर्ती ९०० वर्षांपूर्वीची असून ती तांडव नृत्य करणार्‍या शंकराची आहे. ती ब्रॉंझ धातूची आहे आणि वस्तू संग्रहालयाच्या भारतीय विभागामध्ये ती अग्रभागी ठेवलेली आहे. मात्र या वस्तू संग्रहालयाला भेट देणार्‍या लोकांच्या दृष्टीने तो मोठाच आकर्षणाचा विषय असतो. पण असा विषय ठरलेली मूर्ती चोरीची असावी ही गोष्ट गॅलरीच्या दृष्टीने मानहानीची ठरली आहे.

ही मूर्ती सुभाष कपूर याने या गॅलरीला पन्नास लाख डॉलर्सला विकली आहे. परंतु या मूर्तीच्या संबंधात न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक खटला जारी आहे आणि त्यातून ही मूर्ती चोरीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मूर्ती मुळात तमिळनाडू मधल्या अलियालूर जिल्ह्यातील एका शिवमंदिरातून चोरली गेलेली आहे आणि ती भारत सरकारच्या मालकीची आहे असे सांगितले जात आहे.

२००६ सालीही मूर्ती चोरून जहाजातून अमेरिकेला आणली गेली. साधारण साडेतीन ङ्गूट उंचीची ही मूर्ती अमेरिकेतून ऑस्ट्रेलियात आणण्यात आली आणि सुभाष कपूर या अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका व्यापार्‍याने ती ऑस्ट्रेलियाच्या गॅलरीला विकली. परंतु ती विकत घेताना गॅलरीच्या संचालकांनी ङ्गार चौकशी केली नाही. पण प्रत्यक्षात सुभाष कपूर हा भारतातूून दहा कोटी डॉलर्सच्या अशा मौल्यवान मूर्तींच्या चोरीच्या आणि तस्करीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.