गेल्या काही दिवसांपासून अमिर खानच्या परिवारात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आजोबा होणार आहे. आमिरचा भाचा इमरान खान आणि अवंतिका हे दांमपत्य घरात येणा-या एका नव्या छोट्या पाहुण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
अभिनेता इमरान खानची पत्नी अवंतिका तीन महिन्यांची गरोदर असून, २०१४च्या जून महिन्यात खान परिवारात या छोट्या बाळाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या वैद्यकीय चाचणीत अवंतिकाला डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. याच चाचणी दरम्यान बॉलिवूडमधील या दांमपत्याला ही गोड बातमी समजली.
ही गोड बातमी ऐकून इमरानचे चाहते ऐकून नक्कीच खूश झाले आहेत. त्यानमुळे आता बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आजोबा होणार आहे. त्याशमुळे आता अमिर खानच्याो घरात सध्याे आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळेच सर्वजण आता येणा-या बाळाच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत.