डोंबिवलीत टँक स्फोटात चार जण ठार

डोंबिवली- येथील कल्याण-शीळ रस्त्यावर गायकर कंपाऊंड येथे ठेवलेल्या भंगाराच्या केमिकल टँकमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे चार जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, दोन किला मीटर परिसरातल्या इमारतींना या स्फोटाचे हादरे जाणवले. स्फोट झाल्यावर उरलेल्या तीन टाक्या आजूबाजूच्या चाळीवर येऊन पडल्या. सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाला आहे.

दरम्यादन, या घटनेची माहिती होताच याठिकाणी दोन फायरब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या आहेत. याठिकाणी अजूनही आग मोठ्या प्रमाणात वेगाने पसरत आहे. एमआयडीसी परिसरातल्या दावडीनाका परिसरात ही घटना घडली आहे. या स्फोटामुळे येथील चार कामगार ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

या स्फोटामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. जखमीना उपचारासाठी हॉसिपटलमध्येठ दाखलकरण्याळत आले असून त्यांेच्या.वर उपचार सुरू आहेत; स्फोट झाल्यावर उरलेल्या तीन टाक्या आजूबाजूच्या चाळीवर येऊन पडल्या. यामुळे चाळीतील काहीजण टाकी खाली अडकल्याने जखमी झाले आहेत.