लक्झेंबर्गला पहिले समलैंगिक पंतप्रधान

लक्झेंबर्ग – युरोपीय देशातील व जगातील सर्वात छोट्या देशात समावेश असलेल्या लकझेंबर्ग येथे प्रथमच झेविअर बीटल यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली असून ते समलैंगिक आहेत. विशेष म्हणजे उपपंतप्रधान एटनी श्र्रीडर हेही समलैंगिक आहेत. ४० वर्षीय बीटल यांनी यापूर्वी या शहराचे महापौरपद भूषविले आहे.

या देशात २० आक्टोबरला झालेल्या निवडणुकांत बीटल यांच्या डेमेाक्रेटीक पक्षाने दीर्घकाळ सत्ता उपभोगणार्‍या जीन क्लॉड जंकेर यांच्या ख्रिश्चन सोशल पिपल्स पार्टीचा पराभव केला. जंकेर १९७९ पासून प्रथमच सत्तेहबाहेर फेकले गेले आहेत. या देशाची लोकसंख्या पाच लाखांहून थोडी अधिक आहे.

बीटल यांनी सत्तेवर येताच कोणत्याही लोकप्रिय घोषणा करणार नसल्याचे जाहीर केले असून ट्रिपल क्रेडीट रेटिंग कायम टिकविण्यासाठी काटकसरीचे उपाय योजले जातील असेही स्पष्ट केले आहे.