येमेनमधील मोटार बाँबस्फोटात 40 ठार

साना- येमेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या परिसरात झालेल्या मोटार बाँबस्फोटात 40 जण ठार झाले. गेल्या अठरा महिन्यांतील हा सर्वांत मोठा हल्ला असून, स्फोटानंतर परिसरात गोळीबारही झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असून, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. परंतु या घटनेमागे अल कायदाफचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे लष्करी सूत्रांनी सांगितले.