भारताने सियाचीनमधून सैन्य मागे घ्यावे-पाकिस्तान

इस्लामाबाद – भारताने सियाचीनमधून सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. भारतीय सैन्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझिझ यांनी सियाचीनचा मुद्दा उपस्थित केला आहे.

सियाचीनमधील शुद्ध बर्फ हा पाकिस्तानसाठी पाण्याचा मोठा स्त्रोत आहे. मात्र, या बर्फाचे भारतीय सैन्यामुळे नुकसान होत असून पाकिस्तानला पाणीटंचाई जाणवत आहे, असे अझिझ यांनी म्हटले आहे. सैन्य मागे घेऊन भारताने प्राधान्यक्रमाने सियाचीन मुद्द्यावर तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.