मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर आणि अभिनेत्री कैटरिनाने ‘धूम ३’ मधील मलंग या गाण्यात ‘अॅक्रोबॅट अॅक्ट’ केले आहे. या गाण्यासाठी दोघांनीपण खूप मेहनत घेतली आहे. हे अॅक्ट उत्तमरित्या करण्यासाठी दोघांनी केलेल्या पूर्वतयारीचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रकारच्या अॅक्ट करण्याासाठी किमान दोन वर्षांचा अवधी लागतो. मात्र, आमिर आणि कैटरिनाने केवळ काही आठवड्यांतच या अॅक्टचे काम पूर्ण केल्याचे सिनेदिग्दर्शकाने सांगितले.
‘धूम ३’च्या निर्मात्यांनी आमिर-कैटरिनाला अॅक्रोबॅट अॅक्ट म्हणजेच डोंबारी नृत्य शिकवण्यासाठी सिर्क दे सोलेल यांना नियुक्त केले होते. या गाण्यासाठी दोघांनीपण खूप मेहनत घेतली आहे. हे अॅक्ट उत्तमरित्या करण्यासाठी एखादयाला सर्वसाधरणपणे किमान दोन वर्षांचा अवधी लागतो. मात्र, आमिर आणि कैटरिनाने केवळ सहा आठवड्यांतच या अॅक्टचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे हे गाणे चांगले झाले आहे.
आगामी काळात येत असलेल्या ‘धूम ३’ मधील भूमिकेसाठी आमिरला कठोर आणि सधन प्रशिक्षणाला समोरे जावे लागले आहे. त्याने सर्कशीत जाऊन यासाठी प्रशिक्षण घेतले. इतकेच नाही तर परिपूर्ण चोराची भूमिका साकारण्याकरिता शरिरास योग्य आकार येण्यासाठी त्याने दोन वर्षे सक्त आहारही घेतला आहे. त्यारनंतरच त्याला या सिनेमातील अभिनय दर्जेदारपणे करता आला आहे.