सीमेवर भिंत बांधण्यास हफीज सईदचा विरोध

लाहोर – जमात उल दावाचा प्रमुख हफीज सईद याने देफिया ए पाकिस्तान परिषदेने जम्मू काश्मीर नियंत्रण रेषेवर भिंत बांधण्याच्या केलेल्या घोषणेवर संतप्त झाला असून या निर्णयाच्या विरोधात तीव्र आदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. देफिया ए पाकिस्तान परिषद हा दमात उल दावाच्या नेतृत्त्वाखालील ३० धार्मिक व राजकीय संघटनांचा मंच आहे.

या विषयी सईद एका रॅलीत बोलताना म्हणाला की नवाझ शरीफ सरकारला पश्चिम व पूर्व सीमेवर सुरक्षा हवी आहे व त्यासाठी ही भिंत बांधली जाणार आहे. मात्र आम्हाला तसेच पाक जनतेला सरकारचा हा निर्णय मान्य नाही. कारण भारताबरोबर विसा नियमांबाबत कोणतीही सूट अथवा मैत्री नितीसाठी आम्ही तयार नाही. त्यामुळे आम्ही सध्या सुरू असलेले विरोध आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत.