जगातील सर्वात उंच रोलरकोस्टर फ्लेारिडात

फ्लोरिडा – रोमांचकारी व साहसी प्रकारांची आवड असणार्‍यांसाठी एक खूषखबर आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात जगातील सर्वात उंच रोलरकोस्टर उभारला जात असून ५२० फूट उंचीचा हा कोस्टर अमेरिकन कंपनी यूएस थ्रिल राईडस यांच्यातर्फे उभारला जात आहे. पोलर कोस्टर असे त्याचे नामकरण केले गेले आहे.

Roller-Coaster-florida

(फोटो सौजन्य – Orlando Sentinel)
हा पोलर कोस्टर टॉवरच्या आकाराचा आहे. तो २०१६ साली कार्यान्वित होणार आहे आणि त्यासाठी असलेली ट्रेन ताशी ९६ किमी वेगाने धावणार आहे. याची रूंदी केवळ १५० फूटच असल्याने हा प्रवास करताना प्रवाशांना थरार अनुभवता येईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. याच्या उभारणीसाठी २ कोटी डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. याच्या टॉपवर रेस्टॉरंट आणि दुकानेही असणार आहेत. ज्यांना खूप उंचीची भीती वाटते त्यांना या कोस्टरवरून खाली पाहण्यापेक्षा खरेदी करता यावी, खाता पिता यावे यासाठी ही सोय असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
Roller-Coaster-florida1
जगातील सर्वात मोठा रोलरकोस्टर सध्या न्यू जर्सी येथे असून त्याची उंची ४५६ फूट इतकी आहे.