नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासूनचा जागतिक मंदीचा फटका सोन्याच्या दरावर झालेला दिसून येत आहे. तर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सध्या सोन्याचा भाव २०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे सध्या सोने प्रति तोळा ३१,४२५ रूपये झाले आहे.
जागतिक बाजारातील मंदी आणि स्थानिक बाजारात घटलेली मागणी याचा परिणाम सोने बाजारावर झाला आहे. सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूच्या भावात घट झाली. दिल्लीत बुधवारी सोन्याचा भाव २०० रुपयांनी कोसळला. त्याबरोबर सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले. औद्योगिक क्षेत्राकडून असलेली मागणी घटल्यामुळे चांदीच्या भावात ५१० रुपये घट झाली.
गेल्याि काही दिवसांत चांदीचा भाव ४५ हजार २८० रुपये किलो झाला. न्यूयॉर्कच्या बाजारात सोने ०.८ टक्क्यांनी कोसळून प्रति औंस १२४१.५६ डॉलरवर आले. त्याचप्रमाणे चांदीच्या भावात १.८ टक्क्यांची घसरण झाली. न्यूयॉर्कमधील चांदीचा भाव प्रति औंस १९.८६ डॉलर असा झाला. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या भावात २०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली.