सलमान सध्या शोधतोय ड्रीमगर्ल

सध्यास विवाहाचा सीजन जोरात सुरू आहे. त्यातमुळे बॉलीवूडचा टायगर सलमान खान कधी विवाह बंधनात अडकणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली आहे. सलमान बी टाउनमधील सर्वांत हैंडसम बैचलर आहे. आतापर्यंत त्यायचे नाव बॉलीवूडमधील कित्येक अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे. पण आतापर्यंत सल्लू मियांला एकपण मुलगी पंसत पडली नाही. त्यांची पसंत कशी असणार आहे यावर तो गप्प‍च आहे. एवढे मात्र नक्की की त्याला एखदी ड्रीम गर्लच हवी आहे.

सलमानने जरी त्याच्या स्वप्नातील राणी विषयी काही सांगितले नसले तरी त्याच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने त्या‍च्या जीवनसाथी विषयी रुपरेषा ठरवली आहे. आतापर्यंत त्याच्या नावासोबत अभिनेत्री अथवा विदेशी मॉडेलचे नाव जोडले जात होते. मात्र सलमान बी टाउन मधील कोणाचीच निवड करणार नाही हे फायनल झाले आहे. त्याला एक उत्तम व कौंटूबिक पार्श्वभूमी असलेली मुलगी हवी आहे.

काही दिवसांपूर्वी सल्लूचे नाव रोमानियन टीवी एक्ट्रेस लूलिया वंतूर सोबत जोडले गेले होते. त्यानंतर बिग बॉस सीजन सातमध्ये सहभागी झालेली मॉडेल एली अबरामशी जोडले जात आहे. सलमानचा जीव तिच्यावर असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात सलमान तिच्या सोबत विवाह करेल असे काही जणांचे मत आहे. त्यासाठी अजून किती दिवस वाट पहावी लागणार हे आता सलमानच्याच हाती आहे.