वेगळी भूमिका करायला आवडते- कंगना

बॉलीवूडची हिट अभिनेत्री कंगना राणावत हिला दुस-या अभिनेत्रीला टैग देणे पसंत नाही. तिला नेहमीच सिनेमासाठी वेगळी भूमिका करायला आवडते. ‘कृष-३’ या सिनेमाच्या माध्यामातून तिने करूनही दाखवले आहे. आगामी काळात येत असलेल्यास सिनेमासाठी सुध्दा तिने वेगळेच काही करण्याचे ठरविले आहे.

यावेळी बोलताना कंगना म्हणाली, ‘ मला एखादया सिनेमात दुस-या भुमिकेसाठी टैग करणे आवडत नाही. सिनेमात दूसरी हिरोइन म्हटले तर मला निराश वाटते; या सिनेमात प्रियंका चोप्रा मुख्य भूमिका करीत असताना महत्वपूर्ण भूमिका केली आहे. ‘कृष-३’ या सिनेमात दोन हिरोईन काम करीत आहेत. यामध्ये आम्ही दोघीपण वेगवेगळया भूमिका करीत आहोत. त्या प्रेक्षकांना आवडतील असे मला वाटते.’

‘काइट्स’ या सिनेमातील कंगना आलेला अनुभव पाहता ‘कृष-३’ मधील रोल तिने रिजेक्ट केला होता. कारण की ‘काइट्स’ या सिनेमावेळी आलेल्यात वाईट अनुभवामुळे कंगना काही काळ चिंतित होती. मात्र’कृष-३ चे दिगदशक राकेश रोशन यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे कंगनाला हा रोल करताना अडचण आली नाही.