पाकिस्तानच्या सरन्यायाधीशपदी तस्सादक हुसैन जिल्लानी

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सरन्यायाधीशपदी आज तस्सादक हुसैन जिल्लानी यांची नियुक्ती करण्यात आली. ते इफ्तिकार चौधरी यांची जागा घेतील. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसैन यांनी जिल्लानी यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.

सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपद भूषवलेले चौधरी 11 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर पुढच्याच दिवशी जिल्लानी सूत्रे स्वीकारतील. ते माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचे नातलग आहेत. याशिवाय, भ्रष्टाचार आणि कुशासनाविरोधात लढा पुकारणारे चौधरी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. सभ्य न्यायाधीश अशी ओळख असणार्‍या जिल्लानी यांना सात महिने सरन्यायाधीशपद भूषवण्याचा मान मिळणार आहे.