
नवी दिल्ली – विषय कोणताही असो, त्यावर कॉमेंट करून नव्या वादाला तोंड फोडण्याची समाजवादी पार्टीच्या नरेश अग्रवाल यांची सवय जुनीच आहे. आताही त्यांनी तहलका लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रतिक्रिया देऊन नवा वाद ओढवून घेतला आहे.

नवी दिल्ली – विषय कोणताही असो, त्यावर कॉमेंट करून नव्या वादाला तोंड फोडण्याची समाजवादी पार्टीच्या नरेश अग्रवाल यांची सवय जुनीच आहे. आताही त्यांनी तहलका लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रतिक्रिया देऊन नवा वाद ओढवून घेतला आहे.
तहलका प्रकरणामुळे आता कंपन्या महिला कर्मचार्यांना नियुक्त करताना विचार करतील, त्यांना दूध पोळल्यामुळे ताकही फुंकून प्यावं लागेल, असं नरेश अग्रवाल यांनी म्हटलंय. अनेक उद्योग समूह आता महिलांना नोकरी द्यायला घाबरत असल्याचं निरीक्षण नरेश अग्रवाल यांनी नोंदवले आहे.
तहलका प्रकरणामुळे अनेक मोठ्या कंपन्या महिलांना आपल्या उद्योगात नोकरी देण्यास कचरत आहेत, हा या तहलका प्रकरणाचा मोठा तोटा आहे, असं नरेश अग्रवाल म्हणाले. वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेण्याची नरेश अगरवाल यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा असं केले आहे. अलीकडेच त्यांनी एक चहाविक्रेता देशाचा पंतप्रधान बनू शकत नाही, असं सांगून वाद ओढवून घेतला होता.
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली केली होती. देशाचा पंतप्रधान बनण्यासाठी जो व्यापक दृष्टीकोण हवा आहे, तो एका चहावाल्याकडे असा असेल, असं नरेश अगरवाल हरदोईमधील एका सभेत म्हणाले होते. एखादा शिपायाकडे कधीच कप्तानाची दृष्टी येणार नाही, तो शिपाईगिरीच करेल, असंही ते म्हणाले होते. त्यावेळीही त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. आताही नरेश अग्रवाल तहलका प्रकरणातील महिलांविषयीच्या वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.