टीम इंडियापुढे विजयासाठी २६४ धावांचे आव्हान

कानपूर- तिस-या आणि अखेरच्या वनडेमध्ये‍ वेस्टइंडीजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत पाच बाद २६३ धावा केल्या असून टीम इंडियाला विजयासाठी २६४ धावांचे आव्हान दिले आहे. किरॉन पॉवेल ७०, मर्लन सॅम्यु ल्सा ७१ आणि डॅरेन ब्राव्होच्या नाबाद ५१ धावांच्या जोरावर विंडीजने २६३ धावांपर्यंत मजल मारली.

कानपूर येथे भारत विरूध्द वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान सुरू असलेल्या तिस-या व निर्णायक एक दिवसीय सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने इंडिजचा सलामीवीर जॉन्सन चार्ल्स याला केवळ ११ धावांवर असताना त्रिफळाचीत करून तंबूत परत पाठवले.

त्यानंतर इंडिजच्या किरॉन पॉवेल आणि सॅम्युअल्स यांनी शतकी भागीदारी करत इंडिजचा डाव सावरला. त्यानंतर दमदार फलंदाजी करताना किरॉन पॉवेल ७०, मर्लन सॅम्युाल्सह ७१ आणि डॅरेन ब्राव्हो‍च्या नाबाद ५१ व डॅरेन सॅमीनेही उपयुक्तर अशा ३७ धावा केल्या. टीम इंडियाकडून फिरकीपटू आर अश्विनने दोन, तर रवींद्र जडेजा, भुवनेश्वहर कुमार आणि मोहमद शमी यांनी प्रत्येूकी १-१ विकेट घेतल्या. टीम इंडियाला विजयासाठी २६४ धावांचे आव्हान आहे. आता हे आव्हान टीम इंडिया पेलणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.