तेजपाल प्रकरण जलद संपले पाहिजे – मनोहर पर्रिकर

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तेहलकाचे संपादक तरूण तेजपाल यांचे लैगिंक शोषण प्रकरण जलद संपले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. पर्रिकर यांच्या मते असे हाय प्रोफाईल गुन्हे प्रकरण जादा लांबले तर जनतेच्या विश्वासालाच तडा जाण्याची भीती असते त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. या उलट तेजपाल यांनी भाजप मुद्दामच त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे.

पर्रिकर म्हणाले की मी कुणाच्याच दबावाखाली येत नाही तसेच पोलिसांनीही तपास करताना आरोपीचे पद अथवा समाजातील स्थान याचा दबाव न घेताच जलद तपास करून गन्हा नोंदविला पाहिजे असे माझे मत आहे. कोणत्याही दबावाखाली न येताच पोलिसांनी कारवाई करायला हवी. तेजपाल करत असलेले आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडीन असेही पर्रिकर यांनी सांगितले.  दरम्यान तेजपाल यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या अर्जावर आज निकाल लागण्याची शक्यता असून हा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयात केला गेला आहे .