कानपूर- गेल्यात काही दिवसांपासून टीम इंडियातील सुरैश रैना व युवराज सिंग यांना फार्मसाठी झागडावे लागत आहे. विंडीज विरूध्दच्या मालिकेत रैना व युवराज म्हणवी तशी खेळी करता आली नाही. कोची सामन्याडत रैनाने तीन विकेट घेतल्या आहेत. मात्र त्याला फलंदाजीत चांगला फॉर्म गवसला नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
बुधवारी मालिकेतील अखेरचा आणि तिसरा सामना कानपूरच्या ग्रीनपार्कवर होत असून, या सामन्याला फायनलचे स्वरूप आले आहे. दोन्ही संघ सध्या मालिकेत १-१ ने बरोबरीत असून, कानपूरची लढत जिंकणारा संघ मालिका विजय साजरा करेल. टीम इंडियाचे मुख्य फलंदाज युवराजसिंग आणि सुरेश रैना फॉर्मात नसल्याने कर्णधार धोनी चिंतेत सापडला आहे.
आगामी काळात होत असलेला दक्षिण अफ्रीका दौरा टीम इंडियासाठी हा सामना बर्यााच अर्थाने महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून मालिका विजयाचा धोनी ब्रिगेडचा प्रयत्न असेल. याशिवाय सर्वाधिक कठीण समजल्या जाणार्याअ आफ्रिका दौर्यायपूर्वी भारताचा हा अखेरचा सामना आहे. या सामन्यात विजय मिळवून सकारात्मक ऊजने आफ्रिकेकडे आगेकूच करण्याचा भारतीय खेळाडूंचा इरादा असेल.