मुंबई – विशाल भारद्वाज निर्मित ’डेढ इश्किया’ या हिंदी चित्रपटात अभिनेता नसीरूद्दीन सोबत रोमान्स सीन करतांना सुरूवातीला माधुरी दीक्षित लाजली होती, अनेक दृश्य करतांना माधुरीला या चित्रपटात काहीही अडचण आली नाही, मात्र हिंदी चित्रपटातील दिग्गज नसीरूद्दीन सोबत रोमान्स सीन माधुरी लाजली, ही कबुली माधुरी दीक्षितनेच दिली आहे.
’डेढ इश्किया’ हा चित्रपट 2010 मध्ये आलेल्या इश्किया चित्रपटाचा सीक्वेल आहे. नसीरूद्दीन आणि अरशद वारसी आपल्या मागील चित्रपटाच्या भूमिकेतच आहेत, मात्र हिमा कुरेशी आणि माधुरी दीक्षित हे या सीक्वेलमध्ये नवे चेहरे आहेत. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला त्यावेळी माधुरी दीक्षितने सांगितलं, नसीरूद्दीन सोबत काम करतांना मला कोणतीही घबराहट झाली नाही, त्यांच्या डोळ्यातील भावना खूप प्रबळ असतात, कोणतंही जवळचं दृश्य त्यांच्यासोबत चित्रित करण्यात आलं, तेव्हा मी लाजली असल्याचेही माधुरीने सांगितले आहे.
डेढ इश्कियामध्ये मी माधुरी बेगम पाराच्या भूमिकेत आहे, भूमिका आणि पटकथा ऐकल्यानंतर माधुरीने या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला होता. माधुरी म्हणते, मी इश्किया चित्रपट पाहिला मला तो खूप आवडला, आणि त्याचा सीक्वेल माझ्याकडे आलाय, त्यामुळे मला त्यातील भूमिका करायला खूप आवडलं, डेढ इश्कियाच्या पटकथेत रोमान्स, विश्वास, धोका आणि अनेक बाजू येतात. आम्ही अनेक वेगवेगळ्या ठिकाणी शुटींग केली, दोन-तीन तासांचा प्रवासही या दरम्यान होत होता, आम्ही खूप मेहनत घेतली आणि मज्जाही आली.