बेळगांव – कर्नाटक विधानसभेच्या बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कन्नड भाषक आमदार आणि कन्नडवादी संघटनांनी आपल्या मराठीविरोधी भावना व्यक्त करण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला. त्याचबरोबर विधानसभेतून मराठीतून बोलणार्या आमदारांना मराठीविरोधी आमदारांनी बोलू दिले नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयावर दगडङ्गेक केली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत गायक मन्ना डे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संभाजी पाटील आणि अरविंद पाटील यांनी मराठीतून बोलण्यास सुरुवात करताच त्यांना अन्य आमदारांनी बोलू दिले नाही. त्यामुळे प्रचंड गोंधळ माजला. या गोंधळातच या दोघा मराठी भाषक आमदारांनी सभात्याग केला.
कर्नाटकातील कन्नडचालूवली या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयावर दगडङ्गेक करून कार्यालयासमोरच्या ङ्गलकांची तोडङ्गोड केली. त्याचबरोबर त्यांनी निषेधपर घोषणा देत रस्त्यावर शक्तीप्रदर्शन केले.
बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगावात घेऊ नये, अशी संयुक्त महाराष्ट्रवादी संघटनांचे म्हणणे आहे. मात्र तरीही सरकार बेळगावात अधिवेशन घेण्याचा आग्रह धरत असल्यामुळे त्याला प्रत्त्युत्तर म्हणून मराठी भाषकांचा महामेळावा घेण्यात आला. या महामेळाव्याला येणार्या मराठी भाषकांवरही कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडङ्गेक केली.