‘आप’चा मिडिया सरकारविरुद्ध बदनामीचा खटला

नवी दिल्ली – आपल्या पक्षातील काही उमेदवार बेकायदेशीर मार्गाने निधी स्वीकारत असल्याचा व्हिडीओ जारी केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाने मिडीया सरकार या पार्टलच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याविरुद्ध बदनामीचा फौजदारी खटला दिल्ली न्यायालयात आज दाखल केला. ही सीडी छेडछाड करुन बनविण्यात आल्याचा दावाही पक्षाने केला आहे.

मीडीया सरकारचे सीईओ अनुरंजन झा यांच्यासह या खासगी वृत्तवाहिनीच्या इतर दोन अधिकार्‍यांविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सत्यता पडताळून न पाहता स्टिंग ऑपरेशन राबविल्याचा दावा आपने केला आहे. स्टिंग ऑपरेशनची ही सीडी छेडछाड करुन बनविण्यात आल्याचे आपचे म्हणणे आहे. आपसह दिनेश मोहानिया या आपच्या तिकीटावर निवडणुक लढविणार्‍या उमेदवाराने हा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी 27 नोंव्हेंबरला सुनावणी होणार आहे.