बडोदा – आगामी दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, अनुभवी ३५ वर्षीय वेगवान गोलंदाज जहीर खानचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. मात्र गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजनसिंग सारख्या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळाले नाही. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने सोमवारी दक्षिण आङ्ग्रिका दौर्यासाठी कसोटी आणि वनडे संघाची घोषणा केली.
५ डिसेंबरपासून सुरू होणार्या भारताच्या आफ्रिका दौर्यात दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. या संघात जहीर खानचे एक वर्षानंतर पुनरागमन होत आहे. तो डिसेंबर २०१२ मध्ये कोलकत्ता येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळला होता. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग या दोघांच्या नावाची चर्चा झालीच नाही. कसोटी सामन्यात भारताकडून त्रिशतके ठोकणार्या वीरेंद सेहवागची चर्चा होऊ शकली नाही हे विशेष.
काही दिवसांपूर्वी संघातून बाहेर काढण्यात आलेल्या ईशांत शर्मालाही दक्षिण आङ्ग्रिकेसाठीच्या या संघात निवडण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे तो कसोटी आणि एकदिवसीय सामने अशा दोन्हीतही खेळणार आहे. उमेश यादवला संघात स्थान देऊन वेगवान गोलंदाजांची कसर भरून काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अंंबाती रायडू यालाही दोन्ही संघांमध्ये यष्टीरक्षक म्हणून निवडण्यात आले आहे.
भारतीय संघ खालीलप्रमाणे –
कसोटी संघ – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन् अश्विन, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, मोहंमद शमी, रविंद्र जडेजा, जहीर खान, अंबाती रायडू, वृद्धीमान सहा, ईशांत शर्मा आणि प्रज्ञान ओझा.
एकदिवसीय संघ – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, युवराजसिंग,रविचंद्रन् अश्विन, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, मोहंमद शमी, रविंद्र जडेजा, जहीर खान, अंबाती रायडू, ईशांत शर्मा, मोहित शर्मा, आणि अमीत मिश्रा.