अल्बुकर्क (अमेरिका) – अमेरिकेच्या पश्चिम भागात प्रचंड वादळामुळे शेकडो अपघात झाले आहेत. त्यात आठजणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे न्यूयॉर्क, टेक्सास, कॅलिफोर्निया या राज्यांमध्ये प्राणहानी झाली. हे वादळ आता पूर्वेकडे सरकत आहे. सर्वदूर बर्फवृष्टी, गोठवून टाकणारे तापमान आणि वादळी वार्यांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे, न्यू मेक्सिको आणि टेक्सासमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या वादळाने देशाच्या नैर्ऋत्य दिशेकडील परिसर व्यापला आहे. पुढील आठवड्यात ते दक्षिण भाग आणि अटलांटिकच्या समुद्रकिनार्यावर पोचण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे, सुट्टीच्या मूडमध्ये असलेल्या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वादळाच्या फटक्यामुळे अनेक कार्यक्रम, खेळ, सामने, रस्ते बंद झाले आहेत. कॅलिफोर्निया आणि अॅरिझोनामधील हवामान बिघडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हिमवादळांचा इशाराही देण्यात आला आहे.