तहलकाच्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरींची चौकशी

नवी दिल्ली : गोवा पोलिसांनी शनिवारी रात्री तरुणीच्या लैंगिक शोषणा प्रकरणी तहलकाच्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरींची सुमारे साडेनऊ तास चौकशी केली. रात्री दोन वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती. चौकशीनंतर गोवा पोलिसांनी तहलकाच्या ऑफिसमधील काही कागदपत्रे आपल्यासोबत नेली आहेत.

दरम्यान, या लैंगिक शोषण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तरुण तेजपाल यांचे कुटुंबिय आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप पीडित तरुणीने सांगितले आहे. तेजपाल यांच्या कुटुंबियातील एका सदस्याने घरी येऊन पीडित मुलीच्या आईकडे तरुण तेजपाल यांना वाचवण्यासाठी दबाव टाकल्याचे या तरुणीने म्हटले आहे.

दुसरीकडे, आतापर्यंत आपली चूक झाली हे मान्य करणा-या तरुण तेजपाल यांनी महिला सहका-याने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित मुलगी खोटे बोलत असून, मला याप्रकरणात गोवण्यात येत असल्याचा दावा तरुण तेजपाल यांनी केला आहे.