
बिजिग – चीनच्या किगदाओ शहरात गुरूवारी कोअॅक पेट्रो कंपनीच्या पाईपलाईनला आग लागल्याने झालेल्या स्फोटात किमान ३५ जण ठार तर १३० जखमी झाले आहेत. कर्मचारी पाईपलाईनीच देखभाल व सफाई करत असताना ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ च्या सुमारास ही आग लागली मात्र अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
