
नवी दिल्ली- सहारा समुहाने गुंतवणुकदारांचे 20 हजार कोटी रुपये परत न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने समुहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना कोणतीही मालमत्ता विक्रीस आणि परदेशी जाण्यास बंदी घातली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन आणि न्या. जे. एस. खेहार यांच्या खंडपीठाने हे आदेश गुरुवारी दिले.
