
गुगलने भारतात लाँच केलेल्या नेक्सस पाच ही विक्री अपेक्षेपेक्षा अधिक गतीने झाली असल्याचे समजते. गुगल प्लेस्टोअर्समध्ये हा फोन विक्रीसाठी येताच कांही तासात स्टोअरमधील स्टॉक संपल्याने अखेर दुकानावर स्टॉक संपला अशी पाटी लावावी लागली. मात्र तरीही ग्राहकांची विचारणा न थांबल्याने लवकरच नवीन स्टॉक आणला जाईल असे आश्वासन स्टोअरचालकांना द्यावे लागले अशी खबर आहे.
