लाहोर -लाहौर उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना संपूर्ण पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी लागू केली असून भारतीय सिनेमे रिलीज करण्यासाठी कांही अटी घातल्या आहेत. वादग्रस्त ठरलेल्या टीव्ही टॉक शोचे मुबशीर लुकमान यांनी ही याचिका दाखल केली होती. ते भारत विरोधी म्हणून ओळखले जातात. याचिकेत त्यांनी पाकिस्तानी नियमाप्रमाणे भारतात संपूर्णपणे चित्रित झालेल्या तसेच भारतीय निर्माते असलेल्या चित्रपटांना बंदी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायाधीश खलिद महमूद यांनी वरील प्रमाणे आदेश दिले आहेत.
भारतीय निर्माते पाकिस्तानात चित्रपट रिलिज करताना निर्मात्याचे नांव बदलतात व खोटी कागदपत्रे सादर करून सिनेमे रिलिज करतात असाही लुकमान यांचा दावा आहे. यापूर्वी पाकिस्तानातील १० दूरदर्शन वाहिन्यांना मंजूर असलेल्या वेळापेक्षा अधिक वेळ भारत व अन्य देशांचे कार्यक्रम दाखविल्याबद्दल १ कोटी रूपये दंड आकारला गेला आहे. पाकिस्तान इलेक्ट्रीक मिडिया रेग्युलेटरी अॅथॉरिटीच्या नियमानुसार टिव्ही वाहिन्यांना केवळ १० टक्के वेळात परदेशी कार्यक्रम दाखविता येतात व या दहा टक्क्यात ६० टक्के भारतीय व अन्य देश तसेच ४० टक्के इंग्रजी कार्यक्रम सादर करता येतात.