इंडोनेशियात जाताय? मग अजगर मसाज करा

जकार्ता – इंडोनेशियातील बाली या लोकप्रिय पर्यटनस्थळाला जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे येथे स्पा, मसाज सेंटर्सची संख्या चिक्कार आहे. येथील अशा प्रकारच्या सेंटर्समधून सध्या नवीनच प्रकारचा मसाज केला जात असून त्यासाठी एकावेळी ३० डॉलर्स मोजावे लागतात.

indonesia1
(फोटो सौजन्य – DJ Storm’s Blog)
काय असावा हा मसाज? कांही अंदाज येतोय? नाही ? मग ऐका ! येथील रिफ्लेक्सॉलॉजी आणि स्पा मधून चक्क सापांकडून तुम्हाला मसाज केला जातो. अशा एखाद्या सेंटरमध्ये डोकावले तर स्वतःचे पैसे खर्च करून सापांसोबत लोळत पडलेले लोक पाहायला मिळतात. या मसाजमध्ये कांही काळ सापांना तुमच्या उघड्या अंगावर सोडले जाते. त्यात अजगरही असतात. या मसाजमागचा हेतू असा सांगितला जातो की साप अंगावर फिरत असल्याने आपल्या मनात जी भीती निर्माण होते त्यामुळे शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होण्यास मदत होते. अर्थात असला मसाज करून घ्यायला धैर्य हवेच.
indonesia
कारण हे साप कधीकधी चावतातही. पण घाबरायचे कारण नसते कारण त्यांच्या विषग्रंथी काढून टाकलेल्या असतात. त्यामुळे असे साप चावले तरी मसाज करणार्‍याला आणि करून घेणार्‍याला कोणताच धोका राहात नाही म्हणे. ज्या लोकांनी पैसे खर्च करून असला मसाज केला आहे, त्यांना तो भलताच पसंत पडत असल्याचे मसाज सेंटर चालकांचे म्हणणे आहे.