सोनिया गांधीनी डागली भाजपवर तोफ

भिलाई- काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी छत्तीसगडमधल्या भिलाईमध्ये बुधवारी झालेल्या सभेत भाजपवर तोफ डागली. केंद्र सरकारन छत्तीसगडच्या जनतेसाठी मोठे फंड दिले, पण ते लोकांपर्यंत पोचलेच नाहीत असा आरोप सोनियांनी केला.

कॉंग्रेस सोनिया गांधी म्हणाल्या, छत्तीसगडमध्ये प्रगती नसल्याने तरूण चुकीच्या मार्गावर वळले. विकासाचा गाजावाजा करणार्‍या भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे छत्तीसगडचा विकास झालेला नाही भाजप नेमका कुणाचा विकास करत आहे असा सवाल उपस्थित केला आहे .

कॅगच्या अहवालात भाजप सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांकडं बोट दाखवलं गेलं. पण कारवाई झाली का ? छत्तीसगडच्या भाजप सरकार आणि मंत्र्यांवर आरोप झाले, पण त्यांच्यावर कारवाई झाली का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. छत्तीसगडमधले नागरीक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. छत्तीसगडमध्ये विकासाला प्राधान्य दिलं जात नाही. आदिवासींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जात आहे , असा आरोपही त्यांनी केला आहे. वाढत्या नक्षली कारवायांवरूनही त्यांनी रमणसिंग सरकारवर टीका केली.