नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायमूर्तीनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्टेला जोन्स या महिला वकिलाने केला. त्यामुळे न्यायव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला आहे. या तरुणीने ब्लॉगमधून आपल्यावर गुदरलेल्या या प्रसंगाची माहिती दिली. २४ डिसेंबरला या अज्ञात निवृत्त न्यायमूर्तींनी आपला विनयभंग केला, असे या तरुणीने म्हटले आहे. तिने या न्यायाधीशाने नाव मात्र जाहीर केले नाही.
या प्रकाराची गंभीर दखल सरन्यायाधीश पी. सदाशिवम् यांनी घेतली असून या घटनेच्या चौकशीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान तिघा न्यायमूर्तींची समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष स्वत: न्यायमूर्ती सदाशिवम् हेच असतील आणि समितीमध्ये न्या. रंजन गोगोई आणि न्या. शिवा किर्तीसिंह यांचा समावेश असेल. ज्येष्ठ वकील एम.एल. शर्मा यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या पीठासमोर उपस्थित केल्यामुळे आणि ऍटर्नी जनरल जी.ई. वाहनवटी यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे न्या. सदाशिवम् यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
या प्रकाराला वाचा ङ्गुटल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात काल विविध चचार्र्ंना ऊत आला. एका न्यायमूर्तीवर आरोप करणार्या या महिलेने आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याशिवाय इतरही चार मुलींवर असाच प्रसंग गुदरला असल्याचे म्हटल्यामुळे आणखीनच खळबळ माजली आहे. या प्रकरणात तीन न्यायमूर्ती गुंतले आहेत आणि तरुण वकील महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे हे प्रकार न्यायमूर्तींच्या दालनात झाले आहे असे तिने म्हटले आहे.