
मुंबई- शतकातील सर्वात मोठा धूमकेतू आयसॉनचे लवकरच दर्शन होणार आहे. 27 नोव्हेंबरला सूर्योदयापूर्वी 20 मिनिटे हा धूमकेतू दिसेल. त्यामुळे खगोलप्रेमींना धूमकेतू पाहाण्याची संधी मिळणार आहे. हा धूमकेतू 28 नोव्हेंबर रोजी आयसॉन सूर्याच्या अगदी जवळ येणार असून त्याचे सूर्याच्या पृष्ठभागापासूनचे अंतर 11 लक्ष 60 हजार किलोमीटर इतके असेल. सूर्याच्या जवळ आल्याने आयसॉन धूमकेतूचे तापमान दोन हजार अंश सेल्सिअस होणार आहे. त्यामुळे अंतराळात घडणार्या घडामोडींकडे शास्त्रज्ञांचे लक्ष आहे, असे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी म्हटले आहे.
