पाक अण्वस्त्र प्रकल्पात सौदीची गुंतवणूक

सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अण्वस्त्र प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली असून त्याबदली त्यांना हवी असतील तेव्हा पाकिस्तानकडून अण्वस्त्रे पुरविली जाणार आहेत असे वृत्त बीबीसी ने दिले आहे. गुप्तवार्ता विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला यासाठी देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इराण अण्वस्त्रधारक देश बनल्यापासून सौदीचाही अण्वस्त्रांसाठी प्रयत्न सुरू आहे. गेली दशकभर असे प्रयत्न केले जात असून १९८० मध्येच त्यांनी चीनकडून डझनावारी बॅलेस्टीक मिसाईल घेतली होती.२००९ पासून सौदीचे राजे अब्दुल्ला इराणने मर्यादा ओलांडली तर सौदी अण्वस्त्रांचा वापर करेल असे इशारे यूएस स्पेशन कॉन्व्हायला देत आहेत. गुप्तवार्ता विभागाने सौदीने त्यासाठी पाकच्या अण्वस्त्र कार्यक्रमात मोठी गुंतवणूक केली असल्याची माहिती दिली आहे. या वर्षाच्या सुरवातीलाच पाकने बनविलेली अण्वस्त्रे सौदीत रवाना होण्यास तयार असल्याचेही वरीष्ठ नोटो डिसिजन मेकरचे म्हणणे आहे.

बीबीसीचे डिफेन्स एडिटर मार्क उर्बन यांनीही गेल्याच महिन्यात इस्त्रायलचे माजी लष्कर गुप्तवार्ता प्रमुख अॅमॉस याल्डिन यांनी केलेल्या वकतव्याकडे लक्ष वेधले आहे. अॅमॉस यांच्या म्हणण्याप्रमाणे इराणने अणुबॉम्ब बनविलाच तर सौदी एक महिनाही वाट पाहणार नाही. कारण पाकिस्तानला त्यांनी हवे तेव्हा अणुबॉम्ब आणि अण्वस्त्रे मिळावीत यासाठी अगोदरच त्याची किंमत चुकती केली आहे.

पाकिस्तानने मात्र या वृत्ताचा साफ इन्कार केला आहे.