
पांपोर – दक्षिण काश्मीरच्या पांपोर भागात केशराचे मळे फुलले असून या निळ्या जांभळ्या आकर्षक फुलांनी काश्मीरची जमीन मोहरून गेली आहे तसेच आसमंतात दरवळणार्या केशराच्या घमघमाटाने आलेले पर्यटकही तृप्त झाले आहेत. केशराचे हंगाम आता ऐन भरात आला असून यंदा या रॉयल स्पाईसचे पीकही चांगले असल्याने शेतकरी वर्गही सुखावला आहे. पांपोर या डोंगराळ भागातील हवामान आणि जमीन केशराच्या लागवडीसाठी अतिशय योग्य समजली जाते.



