आसारामपुत्र नारायण साईचा नवा राजकीय पक्ष

नवी दिल्ली – बलात्काराच्या प्रकरणावरून अडचणीत आलेले धर्मगुरू आसाराम बापू यांचे चिरंजीव नारायण साई यांनी बलात्काराच्या प्रकरणात ङ्गरार असतानाही नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे आणि दिल्लीत जंतरमंतरवर जाऊन या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव ओजस्वी पार्टी असे असल्याचे जाहीर केले आहे.

या पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून स्वामी ओमजी यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. त्यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि नारायण साई हे ङ्गरार नसल्याचा दावा केला. ते ङ्गरार नसल्यामुळे आपल्या पक्षाचा प्रचारही करत आहेत आणि लोकांच्या गाठीभेटीही घेत आहेत असा दावा त्यांनी केला. ओजस्वी पार्टी दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरणार असून सर्व ७० जागा लढवणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, नारायण साई याच्या विरुद्ध गुजरातेतील सुरतच्या पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यासाठी त्याचा शोध घेतला जात आहे. पक्षाचे उपाध्यक्ष स्वामी ओमजी यांनी काहीही दावा केला असला तरी नारायण साई पोलिसांना हुलकावण्या देत ङ्गिरत आहे. तो काल दिल्लीत आला आणि तेवढाच वेळ प्रकट झाला. याचवेळी त्याला अटक व्हायला हवी होती, परंतु दिल्ली पोलीस त्याला ओळखू शकले नाहीत. त्यामुळे तो पळाला.