भाजपच्या ’कमळा’चा रंग बदलणार

नवी दिल्ली – भाजपने निवडणूक आयोगाला त्यांचे निडणूक चिन्ह असलेल्या कमळ’चे रंग बदलण्याची केलेली मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. आता इलेक्टॉनिक वोटींग मशिन (इव्हीएम) वरील कमळाच्या चिन्हाची बॉर्डर ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ अशी करण्यात येणार आहे.

निवडणूकीच्या काळात मतदान करताना मतदारांना आपले निवडणूक चिन्ह दिसत नाही अशी शंका भाजपला होती. त्यामुळे त्यांनी इव्हीएम मशिनवर आपले निवडणूक चिन्ह ठसठशीत दिसण्यासाठी कमळाचा रंग काळा पांढरा करण्याची विनंती केली होती. भाजपच्या याच विनंतीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने इव्हीएम मशीनवरील कमळाच्या चिन्हाची बॉर्डर रंग ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या या शक्कलने आता येणार्‍या लोकसभा निवडणूकीत भाजपला याचा किती फायदा होतो हे पहाणे आता औत्सूक्याचे ठरेल.