
भापरताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा याने अवकाशातून इंदिरा गांधी यांच्याशी थेट संंवाद साधला होता. इंदिरा गांधी यांनी राकेशला प्रश्न विचारला होता की, तिथून आपला भारत देश कसा दिसत आहे ? तेव्हा त्याने उत्तर दिले होते. सारे जहॉंसे……. या घटनेची आठवण आज हमखास होते कारण आता आपण मंगळावर स्वारी करून सार्या जगाला हेच दाखवून देत आहोत की आपण तंत्रज्ञानात आणि विज्ञानात कोणाहीपेक्षा मागे नाही. आपण आता खरी दिवाळी साजरी केली आहे. मंगळवारी दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी आपला मार्स मिशन हा उपग्रह घेऊन पीएसएलव्ही २५ या रॉकेटने अवकाशात झेप घेतली तेव्हा ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले नसेल असा भारतीय कोणी नसेल कारण ही भारताची मोठी महत्त्वाकांक्षी मोहीम आहे आणि तिच्यात आपल्या सार्या कौशल्याची परीक्षा होत आहे. या उपग्रहाला मंगळाच्या कक्षेत पोचायला दहा महिने लागणार आहेत. भारतीयांनी आगामी काळात सणासारखा साजरा करावा असा हा क्षण आहे कारण आपण १९७५ साली सुरू केलेली अवकाश मोहीम या क्षणामुळे एका मोठ्या टप्प्यावर येऊन यशस्वीरीत्या पोचली आहे. आजवर आपण नजिकच्या अंतराळात, चंद्रावर मोहिमा पाठवत होतो आणि त्याही कधी स्वत:च्या बळावर पाठवत होतो तर कधी कोणाची तरी मदत घेत होतो.
भाऊबीजेला सुरू झालेली हे ऐतिहासिक मोहीम आंतरग्रहीय आहे. म्हणजे मंगळाकडे झेपावलेला मार्स मिशन हा उपग्रह थेट मंगळाकडे झेपावलेला नाही. तो पीएसएलव्ही २५ या प्रक्षेपक वाहनाच्या मदतीने आधी पृथ्वीला २० प्रदक्षिणा घालणार आहे आणि २१ व्या ङ्गेरीला आपोआप या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे स्वत:च्या ताकदीवर लाखो किलोमीटर वरच्या प्रवासाला जाणार आहे. त्याचा पृथ्वीच्या भोवती ङ्गिरतानाचा वेग मंगळाच्या कक्षेत गेल्यावर कमी करावा लागणार आहे. आपले शास्त्रज्ञ त्याला येथून आदेश देऊन त्याला कमी वेगाने ङ्गिरायला सांंगतील आणि तो त्यानुसार वागेल. भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीची ही कमाल आहे. १९७५ साली आपला पहिला आर्यभट्ट हा उपग्रह दुसर्या देशाच्या मदतीने अवकाशात सोडला गेला होता. १९६० पासून सुरू केलेल्या संशोधनाचे हे ङ्गलित होते. तेथून सुरू झालेला हा भारताचा अवकाश प्रवास आता मंगळावरील मोहीमेपर्यंत येऊन पोहोचला आहे. या प्रवासामध्ये काही वेळा अपयश आले. काही वेळा अंदाज चुकले पण इस्रोच्या संशोधकांनी एकुणात देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखवली आहे.
मार्स मिशन हा उपग्रह मंगळावर उतरणार नाही. अमेरिकेची काही अवकाश याने आणि वाहने मंगळावर उतरली आहेत. त्याच्या तुलनेत भारताचे हे मंगळाच्या कक्षेतले भ्रमण ङ्गार देदिप्यमान वाटणार नाही. परंतु आपण जी मोहीम सुरू करत आहोत ती स्वतःच्या ताकदीवर करत आहोत. त्यामुळे तिचे महत्त्व जास्त आहे. ही मोहीम आव्हानात्मक आहे कारण ती पूर्णपणे यशस्वी झालीय असे पुढच्या वर्षीच्या सप्टेंबर मध्ये तो मंगळाच्या कक्षेतून काढलेली छायाचित्रे आपल्याला पाठवायला लागेल. आजवर प्रगत देशांनी मंगळाला ५१ वेळा ललकारले आहे पण त्यातल्या २१ मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. म्हणून हे आव्हान आहे. मंगळाच्या कक्षेमध्ये मिथेन वायू आहे का याचा शोध लावणे हे या मोहीमेचे उद्दिष्ट आहे. अवकाश संशोधनामध्ये मिथेन वायूचा शोध निर्णायक ठरत असतो. कारण ज्या ग्रहावर किंवा त्याच्या कक्षेत मिथेन वायूचे काही अवशेष किंवा मिथेन वायूवर प्रक्रिया होऊन तयार झालेली काही संयुगे आढळतील त्या ग्रहावर कधी ना कधी जीवसृष्टी अस्तित्वात होती असा अंदाज बांधता येतो. या उपग्रहावर मिथेन वायूचा मागोवा घेणारे एक साधन आहे. या उपग्रहाला आपल्या पाठीवर घेऊन जाणारे पीएसएलव्ही २५ हे रॉकेट ३०० टन वजनाचे आहे. त्याची उंची ४४ मीटर म्हणजे जवळपास एखाद्या सात मजली बिल्डिंग एवढी आहे. या प्रकल्पावर ४५० कोटी खर्च अपेक्षित आहे.
मार्स मिशन मंगळाच्या कक्षेमध्ये ङ्गिरत असताना एक आगळी वेगळी घटना घडणार आहे. २०१४ या वर्षामध्ये मंगळाच्या कक्षेत एक धूमकेतू प्रवेशणार आहे. त्या धूमकेतूचा वेग, त्याचे मंगळापासूनचे अंतर आणि भ्रमणकक्षा यावरून मंगळाच्या स्वरूपावर मोठा प्रकाश पडण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या घटना घडत असतानाच भारताचे अवकाश त्या परिसरात भ्रमण करत आहे. त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी टिपता येणार आहेत. त्यासाठी त्याच्यावर ८५२ किलो एवढे इंधन साठवण्यात आलेले आहे. वर्षभरामध्ये या अवकाश यानाचा प्रवास अब्जावधी किलोमीटर होणार आहे. भारतामध्ये अशी ही गुंतागुंतीची मोहीम आखण्याची क्षमता आहे हे आपण जगाला दाखवून दिले आहे. चीनने या क्षेत्रात हातपाय हलवण्याचा बराच प्रयत्न केलेला आहे. तशी चीन आणि भारत यांची या क्षेत्रात काही चढाओढ नाही पण मंगळाच्या मोहीमेच्या बाबतीत चीनला अपयश आलेले आहे. २०११ साली रशियाच्या मदतीने चीनने आखलेली मंगळ मोहीम ङ्गसलेली आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या या मोहीमेकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. कारण मंगळ मोहीम यशस्वी करणारा चौथा देश ठरणार आहे.