मनःशांती आणि साधेपणाचा अनुभव गांधी आश्रमात

धावपळीच्या जीवनात चार निवांत विसाव्याचे क्षण मिळावे यासाठी माणूस पर्यटनाला पसंती देतो. मात्र लोकप्रिय पर्ययन स्थळांवर होत असलेली गर्दी ही चार क्षणाची शांतता मिळू देत नाही. जगात आजकाल दुर्मिळ बनलेल्या या साध्या गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी प्रथमच राष्ट्रपिता म.गांधी यांनी १९१५ मध्ये गुजराथेत अहमदाबाद जवळ स्थापलेल्या पहिल्या आश्रमाने पर्यटकांना उपलब्ध करून दिली आहे. बापूजींच्या या आश्रमात रात्रीला १००० रूपये असा दर आकारून पर्यटक राहू शकणार आहेत.
Mahatma-Gandhi
या ठिकाणी उतारूंना आधुनिक सुखसुविधा मिळणार नाहीत मात्र गांधी जसे जगले त्या साध्या राहणीचा अनुभव मात्र जरूर घेता येणार आहे. शिवाय येथे चरखा चालविणे, स्थानिक लोकाशी भेटीगाठी, प्रार्थना, मेडिटेशन करता येणार आहे तसेच खादी वापरता येणार आहे.

Mahatma-Gandhi2

अर्थात येथे येणार्‍या पर्यटकांनी गांधींनी अंगीकारलेल्या ११ तत्वांचा स्वीकार केल्यास ती विशेष बाब ठरेल. यात स्वावलंबन, अहिंसा, अपरिग्रह, स्वदेशीचा वापर, आहारनियंत्रण, दररोज किमान ५ किमी चालणे, घरातील सर्व कामे करणे यांचाही समावेश आहे. या आश्रमात राहण्याचा उद्देशच मुळी गांधीजींच्या साध्या राहणीतून शाश्वत जीवनशैलीचा अनुभव देणे हा आहे. मनःशांती आणि साधेपणाचा हा अनुभव पर्यटकांना नक्कीच आवडेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

Mahatma-Gandhi1

या आश्रमाचे व्यवस्थापन गांधीजींनीच स्थापलेल्या  गुजराथ विद्यापीठाकडे असून गांधीजींच्या १४४ व्या जयंतीनिमित्ताने या उपक्रमाची सुरवात २ आक्टोबर रोजी केली गेली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार महिना उलटूनही अद्याप येथे एकही पर्यटक निवासासाठी आलेला नाही.