उंच टाचांचे सँडल करतील पायांचे नुकसान

महिलांचे फॅशन करण्याचे जे अनेक फंडे असतात, त्यात उंच टाचांचे सँडल ही सर्रास आढळणारी फॅशन आहे. अगदी १ इंचापासून ते पाच इंचापर्यंत उंच टाचा असलेले सँडल वापरणे हे महिलांना फारच भूषणावह वाटते. मात्र यामुळे जन्मभर पायाच्या हाडांची दुखणी सोसावी लागू शकतात असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

आजकालच्या धावपळीच्या जमान्यात महिला पुरूषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. त्यामुळे कामावर जाताना अनेकवेळा या महिला धावपळ करतच गर्दीचे रस्ते ओलांडतात, बस, ट*ेन पकडतात. अशा वेळी त्यांच्या पायात उंच टाचांचे सँडल्स अथवा चप्पल असतील तर त्याचा थेट परिणाम या महिलांच्या पायाच्या हाडांवर होतो असे चीनमधील निगबो विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे.

या संबंधी केल्या गेलेल्या पाहणीत ज्या महिला अशा उंच टाचांच्या पादत्राणांचा वापर सतत करून धावपळ करत असतात, त्यांचे बटक्स व व टाचा यांच्या हालचालीत दोष निर्माण होतो व परिणामी पायाच्या हाडांची दुखणी सुरू होतात. अशी पादत्राणे वापरणार्‍या १० पैकी ९ महिला अशा दुखण्यांची शिकार होतात कारण चालताना अथवा पळताना पायाच्या टाचा जरूरीपेक्षा जास्त उंचीवर राहिल्याचा परिणाम पायाच्या नडगीच्या हाडांवर होतो व दीर्घकाळासाठी हाडांच्या समस्यांना या महिलंाना सामोरे जावे लागते असे सिद्ध झाले आहे.

मात्र फॅशनच्या वेडापायी महिला असल्या संशोधनांची अथवा पाहण्याची दखल अजिबात घेत नाहीत असेही आढळले आहे कारण उंच टाचांचे सँडल अथवा चप्पल वापरणार्‍या महिलांची संख्या दिवसेन दिवस वाढतच चालली असल्याचेही निरीक्षणातून सिद्ध झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment