‘क्रिश 3’ आज रुपेरी पडद्यावर झळकणार

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा असलेला अभिनेता हृतिक रोशनचा बहुचर्चित ‘क्रिश 3’ शुक्रवारी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा मुहूर्त साधून सिनेमा प्रदर्शित करण्यात येत आहे. या सिनेमात हृतिक रोशनसह विवेक ओबेरॉय, प्रियांका चोप्रा आणि कंगना राणावत यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

‘कोई मिल गया’चा सिक्वेल ‘क्रिश’ला मिळालेल्या यशानंतर त्याचाच तिसरा भाग म्हणून ‘क्रिश ३’ची निर्मिती करण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या् मुर्हर्तावर रिलीज होत असलेल्या या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या सिनेमात हृतिक रोशन सुपरहिरोच्या भूमिकेत असणार आहे. तर विवेक ओबेरॉय हा व्हिलनची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे हा सिनेमा हिट ठरणार की नाही याबाबत सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर सर्वांची लागून राहिलेली उत्सुकता संपणार आहे.