वॉशिंग्टन – भारतीय उपखंडातील पवित्र धर्मस्थळांमध्ये होणारे विधी हिमालयातील बर्फ वितळण्यामागे कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आलाय. या विधींमुळे ग्लोबल वार्मिंगमध्ये भर पडत असल्याचा संशोधनात दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या नेवादा डेझर्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आणि छत्तीसग़डच्या पंडित रविशंकर शुक्ला युनिव्हर्सिटीनं केलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आलाय.

भारतीय उपखंडांतील भारतासह नेपाळ आणि दक्षिण आशिया या भागात हिंदू, मुस्लिम आणि बौद्धांचं प्रमाण जास्त आहे. या भागातील धार्मिक स्थळांमध्ये होमहवन, धूप, मेणबत्ती पेटवणं, लग्नसोहळ्यातील पवित्र विधी, मरणोत्तर अग्नी यामुळे मोठया प्रमाणावर प्रदूषकं वातावरणात पसरतात.

तसंच अगरबत्ती, मेणबत्ती, कापूर, चंदनाची लाकडे, झाडांची पाने या गोष्टींच्या ज्वलनातून घातक वायू तयार होतात.

यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढतंय असा दावा या संशोधनात कऱण्यात आलाय. 2011 ते 2012 या कालावधीत हे संशोधन करण्यात आलं.