अहमदाबाद – गुजरातमध्ये होणार स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या नावाने होणार्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाचे उद्घाटन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सरदार सरोवर धरणाजवळीस साधू बेटावर होणारे हे स्मारक 182 मीटर उंचीचे असून हे जगातील सर्वात मोठे स्मारक असेल असा दावा ठोकण्यात येत आहे.
सरदार वल्लभभाई पटेल हे लोहपुरुष होते. त्यांनी एकतेसाठी कार्य केले, त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून देशातील प्रत्येक गावातील शेतकर्यांच्या अवजाराचा लोखंडाचा तुकडा आणून पुतळ्यासाठी तो वापरणार आहोत, अशी घोषणा एका महिन्यांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मुंबईतील हिरे व्यापार्यांच्या एका कार्यक्रमात केली होती.