काही दिवसापूर्वीच ‘बेशरम’ या सिनेमासाठी रणबीर कपूरने २० कोटी रूपये मानधन घेतले आहे. बॉलीवुडचा रॉकस्टार रणबीर कपूरने घेतलेल्या या मानधनाची सर्वत्र जोरात चर्चा सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रणबीर परेशान झाला आहे. त्याच्या मते सिनेमासाठी घेतलेल्या २० कोटी रूपये मानधनाची चर्चा सावजनिकपणे करणे चूकीचे आहे.
रणबीर म्हणाला की, मी अशास्वरूपाच्या काही पसरविण्यात आलेल्या चर्चेने परेशान होत नाही. मला काम करण्यास आवडते. त्यामुळे मी सिनेमात काम करीत असतो. पैश्याच्या बाबतीत कोणीच खुलेपणाने चर्चा करायला नको आहे, असे मला वाटते. त्यामुळे आगामी काळात पैशाबाबत चर्चा न करणेच उचित राहणार आहे.
‘बेशरम’ या सिनेमात रणबीर कपूर आई-वडिल नीतू सिंह आणि ऋषि कपूर यांच्या सोबत काम करताना पहिल्यांदा दिसला आहे. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही. त्यामुळे रणबीरला पैशाच्या बाबत चर्चा व्हायला नको आहे. रणबीर आता आगामी काळात येत असलेल्या या सिनेमाच्याा रिलीज होण्याची वाट पहात आहे.