क्विंगडाओ – प्रत्येक क्षेत्रात महासत्ता समजल्या जाणा-या अमेरिकेशी स्पर्धा करणा-या साम्राज्यवादी आणि विस्तारवादी धोरण राबविणा-या ड्रॅगनने आपल्या सामथ्र्याची थोडीशी चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे. भौगोलिक क्षेत्रफळाला अनुसरून लष्करी सामथ्र्य विकसीत करणा-या चीनने नुकत्याच झालेल्या नौदलाच्या प्रात्यक्षिकांमध्ये आपल्या आण्विक पाणबुडीचे दर्शन जगाला करवले आहे.
क्विंगडाओ येथील नौदलाच्या तळावर झालेल्या आण्विक पाणबुडी सुरक्षितता प्रात्यक्षिकांमध्ये चीनच्या नौदलाने आपली आण्विक पाणबुडीही समाविष्ट केली. या पाणबुडीच्या अस्तित्त्वाबद्दल वा तिच्या सामथ्र्याबद्दल मागच्या 40 वर्षांत चीनने कधीही उघडपणे वक्तव्य केलेले नाही. या पाणबुडीने या नौदलाच्या लढाऊ जहाज आणि हेलिकॉप्टर्ससह या प्रात्यक्षिकांत सहभाग घेतला. चीनच्या सरकारी प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार समुद्रावर लष्कराच्या तिन्ही दलांचा एकात्मिक सहभाग असणारी हे आजवरच्या इतिहासातील सर्वप्रथम प्रात्यक्षिक आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या आजवरच्या इतिहासात आण्विक पाणबुडीच्या प्रात्यक्षिकाचे दर्शन आणि त्याबाबतची माहिती सरकारी प्रसार माध्यमांना प्रथमच देण्यात आली आहे. या आण्विक पाणबुडी दलाचे कमांडर रीअर अॅडमिरल गाओ फेंग यांनी प्रात्यक्षिकानंतर सरकारी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, आम्ही चीनच्या पीपल्स आर्मीकडील नौदलातील पहिले आण्विक पाणबुडी दल आहोत. 42 वर्षांपूर्वी या दलाची स्थापना झालेली आहे. मात्र या 42 वर्षांत एकही दुर्घटना अथवा अपघात झालेला नाही किंवा आमचा एकही व्यक्ती या अपघातात आम्ही गमावलेला नाही, यातच आमच्या दलाची कार्यक्षमता सिद्ध झालेली आहे.
समुद्री शेजा-यांचा उपद्रव वाढल्याने आम्ही हे प्रात्यक्षिक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र हे प्रात्यक्षिक घेताना शेजा-यांचीही उपस्थिती होती. कारण हे प्रात्यक्षिक सुरू असताना जपान आणि अमेरिकेच्या लष्करी नौका आणि हेलिकॉप्टर्स या सर्व घडामोडींकडे बारकाईने लक्ष्य ठेवून होते. आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनाही चीनकडे नेमक्या किती आण्विक पाणबुड्या आहेत, हे सांगता आलेलेले नाही. मात्र त्यांच्याकडे किमान 10 आण्विक पाणबुड्या डिझेल आणि पेट्रोलवर चालणा-या 60 पाणबुड्या असाव्यात, असा अंदाज आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांनी वर्तवला आहे.